मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

कशमकश

कभी कभी बहुत कशमकश में फँस जाता है दिल । मुद्दतों से जो पाना चाहा हो और एक बार भी ख्वाहिश का जिक्र तक न किया हो वो अचानक से आपकी जिंदगी मे आ जाए  और सिर्फ आए नहीं बल्कि  आपकी जिंदगी का अहम हिस्सा बन जाए तो हैरत तो होगी ही।  असली दुविधा तो ये है कि अब तक  आपकी जिंदगी  सलीके से एक पटरी पर बैठ चुकी होती है । उसमें सिंगल ट्रॅक होता है ।और ट्रॅक बदलने की न सुविधा होती न गुंजाइश ।लेकिन दिल एक मनचला और जिद्दी  ड्राईवर है जिसके हाथों में ये गाडी दे दो तो बस मनचाहा सफर सामने देख कर पटरी बदलने की कोशिश करता है ।
     लेकिन असली कशमकश तो तब होती है जब दिमाग भी  उतना ही समझदार  और जिद्दी हो । वो जानता है कि जो लौट आया है  जिंदगी मे  ( खैर लौट आना भी तब कहलाता जब वो पहले  आपके पास होता ) वो भले ही दिखता लुभावना हो मगर कहीं किसी मंजर पर दर्दनाक साबित हो सकता है ।शायद कोई मृगजल हो।  शायद कोई छलावा । जो आपकी शांत ठहरी जिंदगी मे कोई सैलाब लाने के लिए  आया हो।
वरना सोच के तो देखे ये दिल कि हममें  ऐसा क्या है जो कोई अपनी जिंदगी में हमें अहम जगह दे? किसी के दिल बहलाने का अस्थाई साधन बनना बहुत शर्मनाक है। माना कि बडी ख्वाहिश थी कृष्ण का एक  अंश भी पाने की । लेकिन यदि पाना ही है तो या तो राधा बनकर, रूक्मिणी बनकर या फिर मीरा बनकर ही सही ।हजारों गोपियों के बीच मे एक बनना यदि स्वीकार होता तो तभी कोई कदम  उठाया जाता । चाँद न मिलने पर वो सितारों से रोशनी करना तो नही चाहते? तो क्या तुझे मंजूर है सितारों में एक बनना? हजारों मे से एक बनना?
मान जा ।सँभल जा। पछताएगा । छलावा, भ्रम कभी न कभी टूटता ही है और जब टूटता है तो बडा दर्द देता है। माना कि आज तुझे महसूस हो रहा है कि कुछ मायने हैं तेरे वजूद के उनके लिए, पर पगले कोहरे को छँटने तो दे। साफ तस्वीर दिखने तो दे।  अभी हिजाब मे है बहुत कुछ। खुलकर सामने आने तो दो । कुछ आजमाईश हो कुछ जाँच परख हो तभी तो रिश्ते की असली सूरत और शिद्दत समझ मे आए। कितना लंबा सफर है ये भी जाना जाए ।

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

प्रेम, प्यार, love

आज हा विषय घेण्याचे कारण म्हणजे नुकताच  आभासी जगातल्या एका मैत्रिणीशी झालेला वादविवाद. बाईसाहेब नेहमी रडव्या ( निराशाजनक/ नकारात्मक ) पोस्ट टाकण्यात पटाईत. तर त्यादिवशी पुन्हा त्यांनी आपले दुःख शेयर केले, " प्रेम बीम काही नसते फक्त एक फसवणूक असते".  मी विरोध केला तर मला म्हणाली कि तू शिक्षिका आहेस म्हणून साहित्यिक( पुस्तकी) बोलतेस. वास्तविक मी गणिताची/ विज्ञानाची शिक्षिका. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय काहीही बोलणार नाही. आणि साहित्याशी माझा संबंध फारसा आलाच नाही.
पण प्रेमाचा अनुभव मात्र पावलोपावली आला. कदाचित माझ्या मैत्रिणीचे ही बरोबर असेल. तिला जे प्रेम अभिप्रेत असेल ते स्त्री-पुरुषांमधील असेल. आणि माझ्या दृष्टीने प्रेम हे व्यक्ती-व्यक्ती मधील, आणि कोणत्याही दोन जीवांमधील आहे. म्हणून ते खूप सुंदर आहे. ती एक ऊर्जा आहे- जगण्याची ऊर्जा.दुसरा एक तरुण मित्र अगदी पुस्तकी किंवा फिल्मी वाक्य बोलला कि खरं प्रेम एकदाच होतं , तेही अर्थात पूर्णपणे मान्य नाही कारण प्रेम पावलोपावली होतं , फक्त त्याची रूपे वेगवेगळी असतात. आणि ती आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातात .
 जेंव्हा नात्यातील चिल्ली पिल्ली आपण त्या घरी राहत नाही हे माहित असून ही, घरात पळत पळत शिरताना "ती मावशी कुठाय?" म्हणून सर्वात आधी विचारतात, ते प्रेमच असते त्यांचे. कदाचित आपल्यातील लहान मूल त्यांना आपलेसे वाटत असेल किंवा चौपट वयाची मावशी त्यांना एक चांगला श्रोता वाटत असेल. काय फरक पडतो?  जेंव्हा एखादा बालमित्र आपल्याला त्याच्या अनुपस्थितीत ही त्याच्या शिळ्या विनोदांनी  हसवू शकतो, आपल्या चेहऱ्यावर स्मित आणू शकतो. मग भले ही  तो त्याचा एकाकीपणा घालवण्यासाठी हे करत असेल, पण आपण तर फ्रेश होतो ना. जेंव्हा एखादी  जिवलग व्यक्ती  अनेक वर्षांनी भेटूनही त्याच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत असे भासवते , भलेही ती सर्वांशी तसेच वागत असेल किंवा तिच्या व्यवसायाचा तो एक भाग असेल सर्वाना प्रसन्न, आनंदी ठेवणे, पण आपल्या आयुष्यात तर चैतन्य निर्माण होतेच ना. एखादी मैत्रीण हक्काने भांडते आपल्याशी जेंव्हा, तिचा राग जरी लटका असला, क्षणिक असला तरी त्यातून तिचे आपल्यावरील प्रेमच  व्यक्त होते.
आपण अनेकदा प्रेमात पडतोच. एखाद्या लहानग्याच्या बाललीलांच्या , एखाद्या सुंदर चित्राच्या, एखाद्या हळव्या सुरेल गीताच्या, अनेकवेळा पाहिलेल्या इंद्रधनुच्या, पांढऱ्या शुभ्र हिमाच्छादित शिखरांच्या, घनदाट हिरव्यागार जंगलाच्या, भावपूर्ण कवितेच्या, हृदयस्पर्शी शब्दांच्या, नाजुकश्या फुलपाखराच्या, इवल्याश्या पक्ष्याच्या , फुलांच्या रंगांच्या किंवा स्पर्शाच्या, मोहक सुगंधाच्या , आपल्याच मनातील खेळाच्या, स्वप्नांच्या  . . . . .
बुरख्याआडून दिसणाऱ्या त्या गहिऱ्या डोळ्यांना धारण करणाऱ्या त्या नितळ सौन्दर्याची कल्पनाच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडून जाते. तर आत्मविश्वासाने पाऊले टाकणारी एखादी आधुनिका  आपल्याला कधी कधी मागे वळून पाहण्यास भाग पाडते ( मी स्त्री असले म्हणून काय झाले, सौन्दर्य मलाही मोहित करू शकते) एखाद्या व्यक्तीची विशिष्ट लकब, त्याचे वेडसर वागणे, किंवा प्रभावशाली शब्दभांडार आपल्याला भुरळ पाडते.
एखादी कादंबरी वाचताना किंवा एखादी कथा पाहताना आपण त्यातील पात्रांच्या प्रेमात पडतो.
आणि सर्वात महत्वाचे आपण स्वतःवर तर अतोनात प्रेम करतोच ना. कदाचित कोणालातरी वाटेल  कि स्वतःवर प्रेम? किती आत्मकेंद्री विचार? पण आपण जितके  स्वतःवर प्रेम करू ना तितकेच ते सहजतेने आपल्याला इतरांवर करता हेते आणि इतरांना आपल्यावर. वागण्याबोलण्यात आत्मविश्वास येतो, आणि सकारात्मकता येते. असं नाहीये कि या सर्वामुळे आयुष्य एकदम सहज सोपं होईल, काही त्रासच उरणार नाही, अडचणी येणार नाहीत,  पण त्यातून मार्गही सापडत जातील. ते मार्ग मनाजोगते सापडले तर आनंदात भर पडते नाहीतर अनुभवात ( शेवटचे विधान कोठेतरी वाचलेले, भावलेले म्हणून ढापलेले 😉😜)
तर हा  आहे प्रेमाविषयीचा माझा दृष्टिकोन. कदाचित सर्वाना नाही पटणार, कदाचित बरेच कंगोरे राहून ही गेले असतील पण आहे हे असं आहे.


बुधवार, ७ जून, २०१७

अविस्मरणीय

आज विषय वेगळा जरासा. म्हणजे माझ्या आयुष्यातील माणसांबद्दल नाही तर एक अविस्मरणीय प्रवास अनुभव. आयुष्यात थोडेसे स्थिरावल्यानंतर ठरवले कि हात पाय धड आहेत तोपर्यंत देशाटन करून घ्यावे. अर्थात सध्या तरी हे देशाटन आपल्या देशापुरतेच मर्यादित आहे. कारण ज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना कधी कधी आपला विषय सोडून इतर ही गोष्टींचे ज्ञान, किमान आपल्या देशाचे तरी ज्ञान, आपल्याला असावेच असे वाटते. आणि तेवढाच रोजच्या आयुष्यात थोडासा बदल. म्हणजे पुढील गाडा रेटायला रिचार्ज होणे थोडक्यात.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असल्याने दक्षिण भारत झाले बऱ्याच वेळा. उत्तरेत मात्र हिमाचल सोडून फारसे फिरलो नव्हतो. प्रशिक्षणाच्या निमित्ताने आणि लहानपणी वास्तव्याच्या निमित्ताने दिल्ली, आग्रा, मथुरा ही झाले होते पण हिमालयाची विविध रूपे उलगडायची होती अजून. त्यात सुटी फक्त मे मध्ये. त्यावेळी बराचसा उत्तर भाग अतिशय तापलेला असतो त्यामुळंही थंड ठिकाण निवडणे गरजेचे होते. 
नेहमी सोबत असणाऱ्या मित्र परिवाराने खूप अभ्यासाअंती सिक्कीम हा पर्याय ठेवला समोर. अर्थातच सिक्कीम आम्हालाही अनोळखी होते त्यामुळे कुतुहूल ही  होते  त्याबद्दल. पण त्या कुटुंबाला ३ दिवस ट्रेन चा प्रवास जमणार नव्हता, म्हणजे त्यांचा स्टॅमिना नव्हता म्हणा तितका, म्हणून जाता येता  विमानाने जायचे ठरले. बाब खर्चिक होती. बजेट  पाहावे लागणार होते म्हणून माझा नकारच होता कारण आम्ही चौघे जाणार म्हणजे वार्षिक बजेट फक्त तिकिटालाच फस्त होत होते. पण शेवटी पतिदेवांचा हट्ट. ते त्यांच्या बालमित्राला नकार देऊ शकत नव्हते. म्हणून आम्ही सिक्कीमला जाणार हे ठरले. धाकट्याचा पहिला विमान प्रवास म्हणून तो जरा जास्तच उत्साही होता. 
९ मे रोजी  पुण्यापर्यंत बसने प्रवास करून १० मे ला  पहाटे ३ वाजता कोलकात्यासाठी   विस्तारा  चे विमान बोर्ड केले. मी, श्रुती आणि पतीदेव सोडून सर्वांचा पहिला विमान प्रवास असल्याने बाकीच्या  ४ जणांच्या मनात खूप काही उलटसुलट  चालले होते.  विस्ताराची सेवा अतिशय उत्तम, म्हणजे अगदी खाण्यापिण्यासह जे हल्ली बऱ्याच कंपन्या देत नाहीत. 
१० तारखेला सकाळी ६ वाजता कोलकात्यात पोचलो तिथून टॅक्सिवाल्याने विमानतळाजवळच्याच एका चांगल्या हॉटेल मध्ये नेले. बजेट मधले, स्वच्छ आणि जवळचे, सोयीचे. कारण दुसऱ्यादिवशी दुपारी पुन्हा बागडोगरा साठी विमान पकडायचे होते. . प्रिबुकिंग वगैरे आम्ही काही केले नव्हते. कारण आम्हाला आमचा प्रवास नेहमी लवचिक ठेवायचा असतो आणि नव्या ठिकाणी प्रत्यक्ष पोचल्यानंतर चौकशी करून प्रत्यक्ष पाहून प्लॅन करणे जास्त योग्य वाटते. हॉटेल छानच होते. आणि त्यांचा कॉम्प्लिमेंटरी नाश्ता ही एकदम स्वच्छ आणि अमर्याद. त्यात रोजच, इडली, उत्तप्पा, शिरा, कॉर्नफ्लेक्स, सॅलॅड, सँडविच अशी भरपूर चॉईस , अर्थात बुफे पद्धतीने.
नाष्टा झाल्यानंतर तिथेच समोरच्या रिसेप्शन काउंटर वर चौकशी केली ,कोलकाता पर्यटनाविषयी, आणि टॅक्सी करून प्रथम व्हिक्टोरिया मेमोरियल हाल पाहायला गेलो. राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर तत्कालीन व्हाइसरॉय जॉर्ज कर्झन याने राणीचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला आणि मग विस्तीर्ण बाग आणि संग्रहालय असणारे हे भव्य स्मारक १९२१ ला लोकांसाठी खुले झाले. या स्मारकामध्ये एकूण २५ दालने आहेत. वेगवेगळ्या दालनांमधून राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे, शिल्पे, राष्ट्रीय नेत्यांचा इतिहास, तत्कालीन हत्यारे आणि कोलकात्याच्या इतिहास मांडण्यात आला आहे. स्मारकाबाहेरच्या ६४ एकरात पसरलेल्या बागेत ही  विविध शिल्पे आहेत. स्मारकाच्या इमारतीवर सुद्धा विविध चित्ताकर्षक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. बागेचे व्यवस्थापन हि बऱ्यापैकी आहे, पण उत्तम नाही म्हणता येणार .

व्हिक्टोरिया मेमोरियल पाहिल्यानंतर आम्ही बसने प्रवास करायचे ठरवले आणि बसने मग हावड्याला गेलो. जगप्रसिद्ध हावडा ब्रिज पाहायला. कोलकात्याच्या बस चा प्रवास टॅक्सी पेक्षा ही सोयीचा आणि स्वस्त. . तिथे पुलावर एक फेरी मारली, तिथली काही फळे घेतली( सुमेधच्या आवडीचे जाम्ब आणि लीची तिथे भरपूर मिळाली खायला, बाळाने मनमुराद ताव मारला). आणि तिथून बसनेच बेल्लूर मठाकडे गेलो. एका गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो कि कोलकात्यात, पोलीस, विद्यार्थी, किंवा नागरिक सगळेच छान सहकार्य आणि मदत करणारे भेटले, कोठेच काहीच अडचण आली नाही, प्रवास करण्यात किंवा माहिती घेण्यात.

बेल्लूर मठ म्हणजे  रामकृष्ण मिशन  आणि मठाचे मुख्यालय. याची स्थापना स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केली. हुगली नदीच्या पश्चिम तीरावर हे मठ वसलेले आहे. परिसरामध्ये असणारे प्रमुख मंदिर हे अतिशय सुंदर, हिंदू, ख्रिस्ती आणि इस्लामिक स्थापत्यशास्त्राचे मिश्रण असलेले मंदिर, रचनेत सुद्धा सर्व धर्म समभाव दाखवते. स्वामी विवेकानंदानी संपूर्ण भारत फिरून विविध स्थापत्यकलांचा अभ्यास केला आणि  त्यावेळी सिविल इंजिनिअर असणारे स्वामी विजनानंद यांनी त्यांच्या कल्पनेनुसार बेलूर मंदिराचे डिजाईन तयार केले.
बेलूर मठाच्या ४० एकराच्या परिसरात, स्वामी रामकृष्ण परमहंस, त्यांच्या पत्नी शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांची मंदिरे आहेत. तसेच रामकृष्ण मिशन चे मुख्यालय , आणि या मिशन आणि मठाचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय ही आहे. मठाला लागूनच एका विस्तीर्ण परिसरामध्ये, मिशन शी संलग्न असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. नदीतीरावर वसलेला मठाचा परिसर अतिशय विलोभनीय असा आहे. तिथून उठावेसे वाटतच नव्हते. नदीतून पलीकडे दक्खिनेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नावेची सुविधा उपलब्ध आहे, पण त्यादिवशी नेमकी कोणत्या तरी कारणास्तव ती सेवा बंद होती, त्यामुळे आम्हाला दक्खिनेश्वर  ला जाण्यासाठी पुन्हा मठाच्या बाहेरून बस पकडावी लागली.

दक्खिनेश्वर काली मंदिरात आम्ही नेमके सायंआरतीच्या  वेळी पोचलो. भारावून जाण्यासारखे वातावरण होते. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि प्रशस्त होता, मुख्य मंदिर सोडून आणखी छोटी छोटी मंदिरे होती तिथे. 12 ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे. शिवाय आणखीही काही मंदिरे. अगदी भारावलेले वातावरण.
तिथून आम्ही हॉटेल वर गेलो. इथेच सहलीतील प्रथम दिवस संपला. सोबतचे मित्र नव्याचा अनुभव घेण्यास फारसे तयार नसल्याने आणि खूपच साशंक असल्याने खाण्यापिण्याच्या बाबतीत फारसे प्रयोग नाहीत करता आले. फक्त पंजाबी डिशेस सर्वत्र खाव्या लागल्या, अगदी बंगाल आणि सिक्कीम मध्ये सुद्धा. त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच कि यावेळी त्या कुटुंबानेही पूर्णपणे शाकाहार अवलंबला.
 दुसऱ्या दिवशी ११ मे रोजी  दुपारी १ वाजता कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरूनच बागडोगरा साठी स्पाईसजेट चे विमान होते. ५० मिनिटांच्या प्रवासानंतर बागडोगरा लष्करी विमानतळावर पोहोचलो. तिथे एका व्यक्तीशी पूर्वीच बोलणी झाल्यामुळे तिथे टॅक्सी पोचली आणि टॅक्सीने मग गंगटोक कडे प्रस्थान. साधारण ४ तासांच्या तिशता नदीच्या सोबत केलेल्या  निसर्गरम्य प्रवासानंतर गंगटोक ला सायंकाळी ६ च्या सुमारास पोहोचलो. तिथेही पूर्वीच एजन्ट शी बोलणी झाल्यामुळे. हॉटेल बुकिंग झालेले होते. फ्रेश होऊन संध्याकाळचे जेवण घेतले. आणि एजन्ट शामशी दुसऱ्यादिवशीच्या नियोजनाविषयी बोलणे झाले आणि त्यानंतर विश्रांती. संपूर्ण सिक्कीमच थंड हवेचे ठिकाण असल्यासारखे वाटत होते. मे मध्ये ही छान पावसाचा शिडकावा आणि बरीच थंडी होती. ११ मे म्हणजे श्रुतीचा वाढदिवस. यावर्षी तो कोलकाता आणि सिक्कीम मध्ये साजरा झाला.
श्यामच्या सूचनेनुसार पहिल्यादिवशी आम्ही स्थानिक साईट सिईंग केले. पूर्ण दिवसासाठी टॅक्सी बुक केल्या. सिक्कीम मध्ये फ्लॉवर एक्सिबिशन , इंचे मोनेस्टरी, ताशी व्ह्यू पॉईंट, बनजाखरी वॉटरफाल्स , तिबेटी संग्रहालय, गणेश टोक  ( मंदिर), ट्री प्लांटेशन,ल्हासा वॉटर फाल ,गोन्जान्ग मोनेस्टरी, इ. ठिकाणे पहिली. फ्लॉवर शो मध्ये अनेक सुंदर सुंदर फुलांचे प्रदर्शन मांडलेले होते. विविध रंगी, विविध ढंगी अशी खूप सारी फुलेच फुलेच एका डोम मध्ये मांडलेली होती. मधेच एक कारंजा विलोभनीय दिसत होता.  pachiopedilum ,hirsutissimum, lilium ,bromeliads अशा विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुले तिथे पाहावयास मिळाली. शो च्या बाहेरील बाजूस स्थानिक स्त्रिया  सिक्कीमचा पारंपरिक वेष बक्खू घेऊन बसल्या होत्या जे पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून देण्यात येत होते. आम्ही सातही जणांनी तो वेष परिधान करून भरपूर फोटो काढून घेतले. ते भडक रंगाचे, चमकदार पोशाख, एकतर सर्व पर्यटकांचे आकर्षण होते, तसेच तिथल्या स्थानिकांचे उत्पन्नाचे एक महत्वाचे साधन. सिक्कीम मधल्या प्रत्येक पॉइंटवर ते पोशाख उपलब्ध होतेच पण फ्लॉवर शो च्या ठिकाणी सर्वात सुंदर रंगांचे मिळाले. त्यानंतर ताशी व्ह्यू  पॉईंटला ही  छान होते, पण एकाच रंगात.
त्यानंतर उल्लेखनीय स्थळे म्हणजे गणेश मंदिर, आणि ताशी व्ह्यू पॉईंट इथले दृश्यही  अगदीच विलोभनीय होते. उंचावरून समोरील, दरी  डोंगर यांचे सौन्दर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे दिसत होते. आणि सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनजाखरी  धबधबा. उंचावरील सुंदर अशा धबधब्या भोवती मानवनिर्मित पिकनिक स्पॉट निर्माण केले होते. साधारणपणे ७० फुटांवरून कोसळणारा धबधबा, वरती निमुळती धार आणि खाली त्याचाच विस्तार झालेला, अगदी मोरपिसाऱ्यासारखा. भोवतालच्या परिसरामध्ये बनजाखरी जमातीची वैशिष्ट्ये दर्शवणारी रचना केली होती. बन्जाखारी म्हणजे वनवासी पुजाऱ्यांची अशी एक जमात ज्यांच्याकडे रोगनिवारणाची दैवी शक्ती होती. अशी मान्यता आहे कि त्यांचे आत्म्यावर  नियंत्रण होते . या धबधब्याचा परिसरामध्ये या जमातीची उपचारशैली, अध्यात्मिक जीवनशैली दर्शवणारी काही शिल्पे आहेत. इथे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ही उपलब्ध आहेत. थोडक्यात हे निसर्गरम्य ठिकाण, धबधबा, एनर्जी पार्क आणि थीम पार्क म्हणून प्रसिद्ध आहे. खाण्यासाठी मात्र इथे फक्त मोमोस, नुडल आणि फ्राईड राईस मिळेल. काही ठिकाणी फुलके ही मिळत होते .
सिक्कीम मधला दुसरा दिवस मात्र अगदीच अविस्मरणीय ठरला. त्यादिवशी आम्हाला नथुला पासला जाण्याची संधी मिळाली. सर्वाना ही संधी मिळत नाही कारण रोज फक्त ७० वाहनांना पासिंग मिळतं तिथे जायला.गंगटोक पासून सुमारे ५४ किमी अंतरावरील आणि  समुद्रसपाटीपासून १४,४१० फूट (४३१०मी ) उंचीवरील हे ठिकाण म्हणजे भारत आणि चीन यांच्यामधील सीमा रेखा. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर   या मार्गे चीनशी होणाऱ्या व्यापारावर बंदी घालण्यात आली होती, म्हणजे हा मार्गच बंद करण्यात आला होता पण २००६ पासून मात्र पुन्हा सुरु करण्यात आला हा मार्ग. इतक्या उंचीवर उणे तापमानात आणि अगदी कमी वातावरणीय दाब असताना, ऑक्सिजनची कमतरता असताना आपले सैनिक तिथे अहोरात्र खडा पहारा देत असतात, याचे फार कौतुक वाटते. कारण तिथेपर्यंत चढून गेल्यानंतर आणि थोडा वेळ तिथे काढल्यानंतर आमच्यातील पुरुष मंडळी पार ढेपाळली. पूर्णपणे हिमाच्छादित असा पांढराशुभ्र परिसर, चांगलीच जाणवणारी थंडी, आपल्या सैनिकांचा तो रुबाबदार अवतार, चीनचे नागरिक आणि त्यांचे सैनिक यांच्याशी झालेली किरकोळ अभिवादनाची देवाणघेवाण, ..... सारेच अगदी अविस्मरणीय.
तिथून साधारण  १००० फूट खाली आल्यानंतर बाबा मंदिर नावाचे ठिकाण लागते. थोडेसे पायी चढून गेल्यानंतर एक सुंदर पांढरीशुभ्र शिवमूर्ती, व त्याच्याशेजारीच फेसाळत धबधबा, अगदी स्वच्छ काळे कभिन्न कातळ . खूपच सुंदर दृश्य. पण तिथंपर्यंत फक्त आम्ही स्त्रियाच गेलो कारण बाकी सगळी मंडळी थकली होती. तिथून आणखी थोडे खाली आल्यानंतर छांगु लेक हे ठिकाण. शुभ्र पर्वतांनी वेढलेले ते नितळ सरोवर फार सुंदर वाटले. तिथेच याक ची सवारी स्थानिकांनी उपलब्ध करून दिली आहे. आणखी एक नवा अनुभव तो ही.
सिक्कीम मधला तिसरा दिवस गंगटोक पासून सुमारे १२५ किमी अंतरावरील लाचुंग या गावी . गंगटोक पासून फक्त १२५ किमी अंतर असले तरी रस्ता इतका वाईट आणि खडकाळ होता कि जायला ५ ते ६ तास सहज लागतात. ३२०० मी उंचीवर वसलेले हे गाव सिक्कीम मधले सर्वात सुंदर गाव मानले जाते. चहुबाजूनी हिमालयाच्या शिखरांनी वेढलेले हे गाव अप्रतिम दिसते, मात्र इथली थंडी आपल्याकडच्या लोकांना अगदीच जीवघेणी. रूम हीटर सुद्धा तिथे निष्प्रभ ठरतो. तिथल्या लोकांचे आतिथ्य आणि माणुसकी मात्र अगदी कुठेच दिसून आली नाही. पर्यटकांशी उद्धट वर्तन, राहायला आलेल्याना  व्यवस्थित सोयी ना पुरवणे हा अनुभव निदान आम्ही थांबलेल्या ठिकाणी तरी सर्वच पर्यटकांना आला. अंघोळीला गरम पाण्याची सोया ही न करून दिल्याने आम्ही अगदी बर्फाळ पाण्याने फक्त हात पाय धुतले. आणि तिथे सर्व काही गंगटोकहुन पुरवले जात असल्याने किमती छापील किमतीपेक्षा खूपच जास्त. असो. रात्रीचा मुक्काम लाचुंगला  करून दुसऱ्या दिवशी युंगथांग वैली कडे प्रस्थान केले. संपूर्ण मार्गात इतक्या विविध आकार आणि रंगाची फुले होती कि मनात विचार आला कि निसर्गाच्या रंगपेटीत जितक्या रंगांच्या छटा आहेत तितक्या रंगछटा जगातल्या कोणत्याही चित्रकाराच्या रंगपेटीत दिसणार नाहीत. युंगथान्गला मिनी स्वित्झरलँड असेही म्हंटले जाते. फुलांनी वेढलेल्या मार्गाने प्रवास करून आम्ही युंगथांग दरीत पोचलो. तेही एक सुंदर दृश्य. चहुबाजूनी हिमालयीन पर्वतशिखरांचा वेढा आणि मध्ये विस्तीर्ण असे पात्र, आणि त्या स्वच्छ पात्रातून वाहणारी लाचुंग नदी. स्वर्गीय दृश्य अगदी. पण थंडी मात्र अगदी गोठवणारी.
युमथांग मध्ये आल्यावर सोबतच एक लहानगा थंडी सहन न झाल्याने आणि प्रतिकार शक्ती अगदीच कमी असल्याने खूप आजारी पडला आणि आम्हाला स्नो पॉईंट न पाहता परत फिरावे लागले. तिथे नुकताच हिमवर्षाव होत होता पण आम्ही या अनुभवास मुकलो. हरकत नाही. There is always a next time . हिमवर्षावापेक्षा त्या लहान मुलाची प्रकृती महत्वाची होती. पण त्या मुलापेक्षाही  लहान असणारी त्याची आई मात्र खूप नाराज झाली तिथे न जाता आल्यामुळे. तरी आम्हाला परत निघावेच लागले. तिथल्या लोकांकडून अतिशय वाईट अनुभव मिळाल्याने आणि वीज नसल्याने हीटर भाड्यानेही  ना घेता आल्याने आम्ही न जेवता त्वरित बाहेर पडलो तिथून. पॅकेज मध्ये जेवण समाविष्ट असूनसुद्धा .
संध्याकाळी परत गंगटोक आणि दुसऱ्यादिवशी सकाळी बागडोगरा साठी टॅक्सी चा प्रवास.  बागडोगरा विमानतळावर लवकर पोचल्याने तिथल्या काही लोकांशी सहज बोलणे झाल्यामुळे कोलकात्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली . बागडोगरा मधून  स्पाईसजेट ने कोलकाताकडे प्रयाण केले. तासाभराने कोलकात्यात पोचलो तर आधी कळवल्यामुळे  पूर्वीच्या हॉटेलने आम्हाला घेण्यासाठी टॅक्सी पाठवल्या होत्या. हॉटेल मध्ये फ्रेश  झाल्यानंतर, लगेच खरेदीला बाहेर पडलो. लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बस ने गरिया हाट ( बाजार ) येथे पोचलो.गोरिया हाट म्हणजे स्ट्रीट शॉपिंग साठी उत्तम ठिकाण. अलिबाबाच्या खजिनाच जणू. सर्व प्रकारचे कपडे, दागिने ,बॅग्ज , आणि बरेच काही, तेही अगदी कमी किमतीत. पण आम्ही डमडमहून तिथंपर्यंत पोहोचेपर्यंत बाजार बंद व्हायची वेळ झाली असल्यामुळे फारशी निवांत आणि मनसोक्त खरेदी नाही करता आली. पण जी झाली ती छान झाली.
दुसरा दिवस होताच हाताशी. त्यादिवशी आम्ही कालीघाट येथील कालीमातेचे सुप्रसिद्ध मंदिर, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निवास स्थान पाहायला गेलो. त्यानंतर आम्ही बोरा बाजार ( बडा बाजार) या ठिकाणी पुन्हा एकदा खरेदीला गेलो. श्रुती नुकतीच व्हायोलिन शिकू लागल्यामुळे, तिच्या सरांनी सांगितल्यानुसार आम्ही कोलकात्यातच व्हायोलिन ची खरेदी केली.. त्यानंतरच मग कापडांच्या बाजार मध्ये गेलो. तिथे मग मुलांचे कपडे वगैरे घेऊन, आणि थोडीफार सोबतच्या मैत्रिणीची खरेदी झाल्यानंतर तिथून बाहेर पडलो ते थेट हॉटेल मधून चेक आऊट करण्यासाठीच. पहाटे २ वाजता पुन्हा NTB एअरपोर्ट वरून विस्ताराचे विमान होते.
पण आठवड्याचा थकवा इतका होता कि विमानात बसल्याबसल्या सर्वाना झोप लागली. अगदी गाढ. जेवण वगैरे दिलेले ही कळले नाही कोणाला. पुण्याला पहाटे पोचल्यानंतरच डोळे उघडले.
या सहलीतील माणसांचे अनुभव म्हणाल तर कोलकात्यामध्ये सर्वच माणसे, मुले, पोलीस सर्वानीच मस्त सहकार्य केले आणि योग्य माहिती दिली. खूपच गोड माणसे खरोखर अगदी रसगुल्ल्यासारखी. अनोळखी शहरात बस, टॅक्सी ने फिरतानाही , खरेदी करतानाही कोणतीच अडचण आली नाही. पण सिक्कीमचा अनुभव अगदी वेगळा. तिथल्या टॅक्सिड्राइव्हर पासून बऱ्याच पुरुषांच्या उद्धटपणाचा पावलोपावली अनुभव आला. पण स्त्रिया मात्र अगदी नम्र, प्रामाणिक, कष्टाळू आणि प्रेमळ. त्यांना पर्यटकांची किंमत नक्कीच माहित आहे त्यांच्या इकॉनॉमी मध्ये. असो. चालायचेच.  प्रकारचे अनुभव गाठीशी असणेही गरजेचे आहे.
अशा पद्धतीने आमची एक सुंदर व अविस्मरणीय सहल पूर्ण झाली. आणि बऱ्याचशा स्मृती घेऊन आम्ही पुन्हा रिचार्ज होऊन परतलो, आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी.





सोमवार, १ मे, २०१७

गूढ.....

लहानपणापासून समवयस्क लोकांपेक्षा चिल्यापिल्यांशी जास्त मैत्री जमायची. आता ही तीच परिस्थिती आहे म्हणा . अगदी एखादे काही दिवसांचे मूल  रडू लागले तरी कन्या लगेच म्हणते, हिच्या हातात आले कि गप्प बसेल लगेच. ओळखीचे असो कि अनोळखी. सतत आपल्यापेक्षा लहान आकाराचा घोळका भोवती असल्याने आजोळी कोंबडी आणि तिच्या पिल्लांची उपमा दिली जायची. प्रस्तावनेस कारण कि पदवीच्या शेवटच्या वर्षी असंच एक ५-६ वर्षाच पिल्लू दोस्त मंडळीत सामील झालं. आणि बघता बघता सगळ्यात जवळचं दोस्त झालं. 
              आकारमानाचा विचार करता तो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा ही  लहान.  And  miniatures are always cute . तसाच हा ही अगदी गोड. थोडा जास्त ऍक्टिव्ह, सतत गतिमान, upto something type, पण तितकाच धीर गंभीर ही वाटायचा त्या वयात ही. कोणीही सहज प्रेमात पडावे असं रूप. मग काय जमली आपली दोस्ती. विद्यार्थी वर्गात मी सर्वात मोठी तर हा सर्वात छोटा. अगदी विजोड मैत्री. पण who cares? मी त्याला आणायला त्याच्या घरी जायचे सायकल वरून. बाळ होतं ते. त्यामुळे इतक्या पहाटे उठायचेही जीवावर यायचे त्याच्या आणि मी येणार नाही तू जा असेही कधी म्हंणणार नाही. झोपेतच  "येणार आहे, येणार आहे " म्हणत राहायचा , त्यामुळे सोडून जाणेही अशक्य व्ह्याचे. मग काय? क्लास ला उशीर ठरलेला. हा लाडोबा असल्यामुळे याला कोणी बोलणार नाही, आणि मी मोठी असल्यामुळे मला उशिरा आल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागायचे. हा उठला नाही म्हणून उशीर झाला म्हंटले कि सरांचे  डोळे विस्फारायचे. (काय पोरगी  आहे ? इतक्या पहाटे, अंधारात, याला आणण्यासाठी इतक्या दूर उलट दिशेने जाते? असे कदाचित वाटत असावे  ☺☺) परगावी गेल्यानंतर सुद्धा मी सर्वात वयस्क असल्याने याला सांभाळण्याची जबाबदारी माझी हे अलिखीतच होते, कारण मीही जरी विद्यार्थिनी असले तरी मुले सांभाळणे हे मुलींना जन्मजात जमते असाच जनमत  असावा. मात्र पिलू फार समंजस होतं. त्रास कधी झालाच नाही त्याचा. उलट त्याला अतिशय त्रास होत असताना त्याने दाखवलेला समंजसपणा आणि त्याला होणाऱ्या वेदना पाहून डोळ्यात पाणी यायचं.
               एक वर्षभराची दोस्ती आमची. त्यानंतर माझे लग्न झाले आणि सर्वांचा संपर्क जवळ जवळ तुटला. आणि मग...... एक दिवस...जवळ जवळ २० वर्षांनी  मार्कच्या चेहरापुस्तकाच्या साहाय्याने तो एक दिवस अचानक दिसला. दिसला म्हणजे दुरून, आभासी. आणि चटकन प्रतिक्रिया आली माझी," hi! ओळखलंस मला?" अर्थातच शक्यता अजिबात वाटत नव्हती कारण तो खूप खूप लहान होता तेंव्हा आणि २० वर्षानंतर त्याला लहानपणीचे काही आठवणे जवळ जवळ अशक्यच. पण आश्चर्य म्हणजे त्याची चटकन प्रतिक्रिया आली, " ...... sir 's wife ? " " १०० percent "
पहिली प्रतिक्रिया जराशी चटका लावणारी होती. त्याला मी नव्हते आठवत, सरांची पत्नी  आठवत होती . तरी त्याने ओळखले हेच कौतुक होते. मग आमचे संभाषण सुरु झाले. भेटलो नव्हतो आम्ही अजून. म्हणजे मीच टाळले होते. कारण २ वर्षात ताणतणावामुळे मी खूप आजारी दिसू लागले होते. आणि त्याला इतक्या वर्षानंतर त्याला भेटताना मला तेवढीच निरोगी आणि प्रसन्न म्हणून त्याला भेटायचे होते. पण जवळ जवळ बरेच महिने गेले आणि मग म्हंटले आता वाढत्या वयाबरोबर आपण असेच अशक्त दिसणार, आणखी टाळायला नको. आणि आम्ही भेटलो. मला वाटायचे कि जशी माझ्या भाच्या, पुतण्यांना मला इतक्या वर्षानंतर पाहण्याची फक्त उत्सुकता आहे. ती आता कुठे आहे? कशी आहे? हे जाणून घ्यायचंय तसेच यालाही एकदा भेटण्यापुरती उत्सुकता असेल.आणि एकदा भेट झाल्यानंतर, ती उत्सुकता शमल्यानंतर तोही अलिप्त होईल.  पण त्याच्या डोळ्यात, वागण्यात, बोलण्यात मला सतत, आपुलकी प्रेम दिसलं, जे त्याच्या वयाच्या मुलांकडून काही अपवाद वगळता अपेक्षित नाहीये. तरीही मनाची तयारी काही होईना.आणि काही दिवसानंतर. का कोण जाणे अचानक एक गूढ वलय निर्माण झाले त्याच्या भोवती माझ्या दृष्टिकोनातून, जे भेदण्याची मला  भीती वाटू लागली.   एक अंतर ठेऊनच राहिले मी . तो  मूडी वाटू लागला. कशाचा राग येईल याला, आणि कशावर चिडेल हा काही सांगता येत नाही असे सतत उगाचच  वाटायचे. माझ्या नेहमीच्या थट्टेखोर स्वभावाचीही मला काळजी वाटायची.त्याने उत्तर दिले नाही कि चिंता वाटायची.  प्रत्येक वेळा भेटल्यानंतर मी चुकते आहे, असा समज करून घेण्यात ,असं वाटायचं, पण मनात खूप खूप खेळ चालायचे.
. इतक्या वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले होते. आणि त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहित नव्हते, कारण तो जेंव्हा भेटला छान, प्रसन्न, प्रेमळ असाच भेटला. पण एक दिवस मला तो निराश वाटला. अंदाज करत राहिले मी कि याला या वयात काय त्रास असू शकेल? एक सुंदर निरोगी कुटुंब, छान मित्र परिवार, ज्ञानाचे तेज, इतकं असताना त्याच्यासारख्या तरुण मुलानं निराश व्हायला काही कारण असावं हे पटत नव्हतं. नुकतंच लग्न ही झालं त्याचं . आणि एक छानशी अर्धांगिनी मिळाली त्याला. त्याच्या तेजापुढे  कदाचित थोडीशी विझल्यासारखी वाटली मला. पण हे फक्त मनाचे खेळ. १५ मिनिटाच्या भेटीत काय कळणार ना ?  मग म्हंटलं त्याला त्याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसलेले  आवडो अथवा न आवडो, आपण त्याच्याशी बोलायचेच, जे आतापर्यंत मी टाळत  आले होते,(कारण यांच्या पिढीच्या स्पेस वगैरेंच्या कल्पना जाणून  होते ना ). त्याच्याशी बोलल्यानंतर कळले कि तो मूडी वगैरे काही नाहीये, पण त्याच्यात दुर्मिळ असा एक सद्गुण आहे, जो त्याला त्रासदायक ठरतोय. त्याच्याबद्दल आणखी प्रेम, आपुलकी वाटायला लागली, पण अंतर तरीही तसेच राहिले किंबहुना थोडेशे वाढलेच.  कारण मला माझी मर्यादा लक्षात आली. याची बौद्धिक, मानसिक भूक मोठी आहे, आणि मी त्याबाबतीत अगदीच कफल्लक. याचा त्रास कमी करणे, याची बौद्धिक भूक भागवणे हे आपल्या आवाक्यातले नाहीये हे कळले. कारण मी अगदीच सामान्य. चार चौघींसारखी. आणि याला कदाचित खूप बुद्धिमान, परिपकव व्यक्तीपाशी आपले मन मोकळे करावेसे वाटत असेल. कुतूहल आहेच. पण फक्त वाट पाहू शकतो आपण. त्याला वाटले आणि त्यातून त्याला खरंच काही शांतता मिळणार असेल तर बोलेल तो कधीतरी. मग आपल्या कुवतीनुसार जे काही जमेल ते मार्ग शोधण्याचा निदान प्रयत्न तरी करू आपण.
सध्या तरी द्विधेत आहे. जास्त बोलू कि नको याच्याशी म्हणून.
कधी कधी माझी मलाच लाज हि वाटते कि हे पोर नेहमी स्वतः हुन बोलतं माझ्याशी. informally पण आणि मी फक्त कामाचेच बोलते. पण........  कदाचित कधीतरी माझ्या मनातील समज बदलेल. माझा दृष्टिकोन नेहमी बरोबर असतो असे नाही ना. कधी कधी फक्त आपल्या मनात काही समज गैरसमज असतात. जे बोलल्याने, व्यक्त झाल्याने, सहवासाने दूर होतात. आणि मी वेडी आहे. काहीही समजून घेते, किंवा काहीही कल्पना करते.

बुधवार, २२ मार्च, २०१७

कधी कधी

कधी कधी
मेरे दिल में खयाल आता है....... 
मनाला जसे पंख असतात ना 
तसे देहाला ही  पंख फुटावे 
हलके हलके व्हावे आणि आकाशभर विहरावे 
आपल्याला कुण्णीच  पाहणार नाही 
अशा एखाद्या निर्मनुष्य बेटावर स्थिरावे. 
आणि मग....... 
बिनधास्त मन मानेल तसे जगावे. 
चिखलाची पर्वा ना करता जमिनीवरच झोकून द्यावे 
आणि वर अंगभर पाऊस पांघरावे. 
साचलेल्या डबक्यातून लहानपणासारखे डुबुक डुबुक उड्या माराव्यात 
धोधो बरसणाऱ्या त्या सरी आपल्या अंगावर झेलाव्यात .. 
आणि कधी  हिरवळीच्या  मऊ गालिच्यावर मनसोक्त लोळावे. 
अनिर्बंध स्वप्नांमध्ये हरवून जावे. 
कधी कधी..... 
वाटतं वयाबरोबर शरीराला येणारी मर्यादा झुगारून द्यावी. 
कोणतीच  बंधने न मानावी. 
विकारांची चिंता ना करता, 
आवडेल ते आणि आवडेल तेवढे खादडावे 
मनसोक्त नाचताना, दुखणाऱ्या पायांची तमा नसावी. 
आणि नदीत डुंबताना आजारी पडण्याची काळजीही नसावी. 
 कधी कधी ...... 
असेही वाटून जाते कि 
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती बरोबर खूप खूप बोलावे 
निर्मळपणे स्वतःला व्यक्त करून पुन्हा निर्मळच  व्हावे. 
सोशिकपणाचा आव आणणे सोडून द्यावे 
आणि कधीतरी  एकदा मनसोक्त रडून घ्यावे. 
कधी कधी ......... 
असेही वाटते कि  आजूबाजूचे माणसांचे जग थोडा वेळ अदृश्य व्हावे. 
आणि ते फक्त फुलं, पाखरांनी, पुस्तकांनी भरून जावे. 
त्या जगामध्ये आपण इतके हरवून जावे 
कि स्वतः हि स्वतःला ना सापडावे. 
कधी कधी......... 
खरंच मनाला कसे पंख फुटतात ना? 
कुठे हि नेत  मग ते आपल्याला ☺☻☺☺☺☺

मंगळवार, २१ मार्च, २०१७

सौभाग्यवती

वैसे तो मैं ये अपनी मातृभाषा में बेहतर लिख सकती थी लेकिन चूंकि अब राष्ट्रीय स्तर पर दोस्त हैं तो उनमे से कुछ अजीज दोस्तों की फरमाइश पर हिंदी में ही सही. पहले तो मुझे इस टाइटल के बारे में बताना पड़ेगा अपने गैरमराठी दोस्तों को. महाराष्ट्र में जब लड़की का विवाह हो जाता है तो उसके नाम के आगे सौभाग्यवती लग जाता है, जैसे और जगहों पर श्रीमती लगता है. और जब तक वो सुहागन है ये उपाधि उसके साथ रहती है क्योंकि पति की मृत्यु या फिर तलाक के बाद वह दुर्भाग्यवती बन जाती है शायद.
शादी के पहले कुमारी, शादी के बाद पति के साथ होने तक सौभाग्यवती. 
जब से मैंने अपने आसपास देखना शुरू किया है तबसे ऐसे कुछ किस्से , ऐसी कुछ घटनाएं सामने आयीं की इस टाइटल के बारे में दिल में सौ प्रश्न उठने लगे. मेरी कुछ रिश्तेदार, मेरी कुछ सहकर्मी, और मेरी कुछ अजीज दोस्त, इनके साथ घटी घटनाएं. 
मेरी एक ममेरी बहन है  जिसकी शादी उसके किसी रिश्तेदार से हुई थी. शादी के १० साल तक भी वो अपनी पत्नी को कोई सुख नहीं दे पाया क्योंकि उसका दिल कहीं और लगा था शायद. और फिर उसने अपनी उस प्रेमिका के साथ खुदखुशी कर ली. इसका सारा दोष मेरी बहन के सिर  आया. क्योंकि ये उसका दुर्भाग्य था. खैर वो सौभाग्यवती बनी  थी तो फिर उसने ये दिन क्यों देखा?
मेरी एक सहकर्मी जिसके माता पिता ने उसे अच्छे से पढ़ाया लिखाया ताकि वो किसी डॉक्टर की सौभाग्यवती बने. अच्छा घर, अच्छा लड़का, एक बेटा  भी हुआ. और दूसरे की उम्मीद थी , तभी पति से कोई व्यावसायिक  दुर्घटना हो गई, और उसने अपनी जान लेली. वो अकेली जो अब सौ. नहीं रही थी २ बच्चों के साथ ज़िन्दगी से झूझ रही थी. लेकिन उसका दूसरी शादी करना उसके खानदानी रिश्तेदारों को मंजूर नही था. 
मेरी एक अच्छी दोस्त को शादी के ६ महीने बाद पता चला की उसके पति का बाहर  कोई अफेयर है. फिर भी वो सौभाग्यवती? दूसरी मेरी एक दोस्त. उच्च शिक्षित. लेकिन शादी के बाद पता चला की उसके साथ धोका हुआ है, पति व्यसनाधीन है. बीमार है. फिर भी वो सौभाग्यवती ही कहलाएगी क्योंकि पति है. और उसके एक साल बाद पति  के गुजरते ही वो सिर्फ दुर्भाग्यशाली नहीं अशुभ भी बन गई. (अगर महाराष्ट्र में किसी गांव या छोटे शहर में  होती न वो तो न अपने पसंद के कपडे गहने पहन पाती , न किसी शुभ कार्य में शामिल हो पाती ). शायद सभी जगह यही हालात हों आज के अंतरिक्ष युग में भी. यहाँ तो मैंने यही देखा है. की जो लड़की पति से मिलने से पहले बिंदी, गहने पहन सकती थी वो उसके जाने के बाद नहीं पहन सकती? वह इतनी अशुभ कैसे हो गई. उसने तो नहीं चाहा था अपनी ज़िन्दगी में इस तरह की घटना का होना. उसे तो ये तिरस्कार , ये अपमान कभी भी मंजूर नहीं था. फिर भी ये उसके हिस्से में आता है. 
मैं हैरान इस बात से हूँ की किसी औरत को शादी के बाद कितना भी दुष्ट, व्यसनाधीन, मारपीट करने वाला, पशुतुल्य व्यवहार करने वाला पति मिला हो. उसकी ज़िन्दगी चाहें नरक बन गई हो फिर भी वो सिर्फ इसलिए सौभाग्यवती है क्योंकि उसका पति है. और पति के मारने या अलग होने के बाद वो चाहे जितनी  भी सुखी हो जाये सौ. नहीं है. 😞😞  कुछ पति तो ऐसे भी  देखे हैं जो पत्नी के चरित्र पर शक करके उन्हें जान से ही मार देते हैं. क्योंकि चरित्रहीनता व्यक्तिसापेक्ष है. अगर उनके साथ किसी और औरत के सम्बन्ध हों तो मर्दानगी की निशानी और पत्नी के साथ कोई साफ़ सुथरी  दोस्ती भी करे तो चरित्रहीनता. और इस तरह के व्यवहार करने वाले लोग सिर्फ अनपढ़ गंवार, पिछड़ी मानसिकता के लोग हैं ऐसा कटाई मत सोचियेगा, इसमें सूट बूट वाले सरकारी अधिकारी, उच्च शिक्षित, उच्चपदस्थ लोग भी शामिल हैं. 
एक लड़की अपना पूरा घर परिवार छोड़कर, इनका घर बसाने आती है. इनकी और घरवालों की सेवा करती है ऊपर से दान दहेज़ भी देना है इन लोगों को बेटी के साथ. ( शादी का सौदा भी अजीब है न ? अपने दिल का टुकड़ा भी दो और कीमत भी दो) और उसपर ये व्यवहार. 
ज्यादा हैरानी इस बात की होती है की पति चाहे देवता हो या या दानव, उसके जाने का कुछ दुःख तो उसकी पत्नी को होगा. शायद थोड़ा काम या ज्यादा.  उसके दुःख को कम करने के बजाय हमारे समाज की स्त्रियां ही उन्हें ज्यादा से ज्यादा चोट पहुँचाने की कोशिश करती हैं. " देखो उसे, उसने फूल लगाए बालों में, उसने पायल पहन ली. उसने अच्छी साडी पहन ली. वो शुभ कार्य में, त्यौहार में  आ गई. ये तो अपशकुन हो गया. "
मैंने अपनी कुछ पड़ोसिनों से कहा भी कि  देखिये वो जो भी कर रही है ये उसका निजी मामला है, इससे न तो आपको कोई तकलीफ होनी चाहिए, न ही आप पर कोई बोझ पड़ने वाला है. वो अपने बल पर और अपने परिवार की मर्जी से कर रही है तो बेकार समय न बर्बाद करें. कुछ अच्छी बातें कर अपनी जुबान साफ़ रखे , कुछ नया सीखें, कुछ नया सिखाएं.  कुछ बहने समझ गई. कुछ नहीं।
इस सबका सारांश सिर्फ इतना है की अगर पत्नी के  आने  पति के अस्तित्व में कोई फर्क नहीं माना  जाता तो हमें यही बात एक स्त्री के लिए भी सोचनी   चाहिए. ईश्वर ने तो सबको एक जैसा बनाया है. 
सोचिये की ये टाइटल किसके लिए होना चाहिए और इसका मतलब क्या है. सिर्फ पति होना सौभाग्य नहीं ,अच्छा समझदार जीवनसाथी होना भी जरूरी है इसके  लिए.