मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

रानी

हम एक दूसरे से ज्यादा बातें नहीं कर पाए थे क्योंकि  वहाँ ट्रेनिंग में दिनचर्या काफी व्यस्त थी, और लोग ज्यादा, तो हर किसी से ज्यादा बातें होना संभव नहीं था. उस दिन उनके राज्य का सांस्कृतिक प्रदर्शन था. वो भरतनाट्यम करने वाली थी. लेकिन उसके पास ज्यादा गहने नहीं थे जो डांस के लिए पहने जा सकें. तो मैंने और मेरी एक मराठी दोस्त ने उसे अपने गहने देने का प्रस्ताव रखा. वो खुश हो गई. उसने शानदार प्रदर्शन किया था.
उसी दिन रात को वो हमारे हॉस्टल के कमरे में आई. उसके हाथ में दो बालियां थीं हम दोनों के लिए. कृतज्ञता जताने के लिए. वो एकदम सीधी साधी  सी थी. विद्वान् तो थी बहुत पर दिल से एकदम साफ़. हमें बालियां देकर वो हमारे चेहरे के भाव पढ़ने की कोशिश कर रही थी. हम लोग ऐसी बड़ी और चमकीली बालियां नहीं पहनते पर उसके चेहरे के भाव देख कर मैंने इतनी ख़ुशी जताई, और उनकी तारीफ़ की उसके चेहरे पर राहत उमटी की चलो मेरा तोहफा इन्हें पसंद  आया. वही मेरे लिए बड़ी बात थी. मेरी दोस्त ने उन बालियों को पहनने में अनिच्छा जताई. मैंने उसे समझाया की यहाँ हमें कोई नहीं जानता , अगर उसकी ख़ुशी के लिए हम कुछ देर पहन लेंगे तो उसे अच्छा लगेगा. और मैंने किसी के कुछ कहने की फ़िक्र किये बिना दूसरे दिन उन्हें पहना. 
वो खुश थी.  उसने हमारी भी काफी मदद की हमारे प्रेजेंटेशन के लिए. असल में उसे गहनों का बहुत शौक था और कपड़ों का भी. हमने उसकी खरीदारी भी करवाई क्योंकि उसे हिंदी नहीं आती थी, तो उसे दिल्ली में खरीदारी करने के लिए किसीकी मदद की जरूरत थी. उसे मेरी पायल बहुत पसंद थी. और मैंने तब से सोच रखा है की अगली किसी प्रदर्शनी में  मैं उसके लिए भी वैसी ही पायल ढूंढूंगी. लेकिन अभी तक मिली ही नहीं. और अब ये  खबर मिली कि  उस पायल को पहनने वाली ही नहीं रही अब इस दुनिया  में. वो रानी थी. एकदम दिलदार और साफ़ दिल भी.. सिर्फ ३ हफ्ते हम साथ थे लेकिन आज भी कुछ यादें जहन में रह गेन. उसकी आँखों की चमक, उसके चेहरे की वो मुस्कान, और उसका प्यार से बात करना किसीसे भुलाया नहीं जायेगा. ईश्वर उसकी आत्मा को शांति दें. 

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

नाते

साधारणपणे दोन ते अडीच वर्षांपूर्वी मला तो एका प्रशिक्षणादरम्यान भेटला. खूप दुरून आम्ही सर्व जण आलो होतो. अगदी भारताच्या सर्व कोपऱ्यातून. त्यामुळे एकमेकांबद्दल कुतूहल असणे साहजिक होते. प्रत्येक जण दुसऱ्याशी  बोलण्याचा ,त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या १४८ जणांपैकी हा ही  एक. एकदम साधा सुधा , आजकालच्या मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळा. माझ्यासाठी त्याचे अस्तित्व इतर सर्वांसारखेच.  फार वेगळा असा तो मला जाणवलाच नाही पण पहिला आठवडा संपता संपता  आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि त्याच्या बोलण्यातून जाणवले कि अगदी सुरुवातीपासून तो माझ्या आसपास नुसता नाहीये तर तो माझ्यावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे. माझ्या खाण्यापिण्यापासून माझ्या वागण्याबोलण्यापर्यंत. तसे इतर सर्वांच्याही मी एव्हाना लक्षात आले होते पण याचे काहीतरी वेगळेच. एका रविवारी आम्ही फिरायला बाहेर गेलो असताना काही अडचणींमुळे आम्हाला यायला मध्यरात्र उलटून गेली तर हा बिचारा तितका वेळ जागाच.
           आणि मग दुसऱ्यादिवशी मला म्हणाला, "मेरी कोई बहन नाही है. मुझे हमेशा से आपके जैसी ही  दीदी चाहिये थी . क्या मैं आपको दीदी बुला सकता  हूँ ? "  नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता  कारण त्याने काही चुकीची मागणी केली नव्हती. त्यादिवसापासून अगदी माझ्या भोवती होता. सक्ख्या भावाने ही घेतली नसती इतकी काळजी घ्यायचा,खूप जपायचा. मी कधी कधी अवघडून जायचे, कारण हा पंचविशीतला असला तरी उंचापुरा आणि मी चाळिशीतली असले तरी तुलनेने बारिकच. ह्याचे सतत सोबत असणे, वर्गात सोबत बसणे , बाहेर जातानाही सतत सोबत असणे, सतत फोटो काढत राहणे  लोकांना खटकू शकते असे जाणवून मी खूप अस्वस्थ व्हायची, पण याला मात्र परवाच नव्हती.  बर रात्री रूमवर गेल्यावर ही झोपेपर्यंत याचे मेसेज आणि सकाळी उठल्यापासून पुन्हा सुरु. नाष्ट्याला  गेल्यावर वेळा एक व्हाव्यात म्हणून सकाळी लवकर उठून आवरायचा. जेवताना ही काही कमी पडू नये हे पाह्यचा.  कधी रोल नंबर प्रमाणे गट पाडताना  मी वेगळ्या गटात गेले तरी हा अस्वस्थ व्हायचा आणि वर्गात माझा फोन ऑफ असतो हे माहित असून ही सतत मेसेज करायचा, आणि मी उत्तर देत नाही म्हणून रडवेला व्हायचा.  बाहेर नेताना ही आमच्या बसेस रोल नंबर प्रमाणे एक व्हायच्या  नाहीत, म्हणून रडकुंडीला यायचा , आणि बस थांबण्याची वाट पाहायचा. आमच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर माझे पाय दुखले म्हणून मी रडले तर हा दिवसभर रडून ना जेवता बसला, आणि मी आपली चार वेळा जेऊन व्यवस्थित. पुन्हा त्याच्यासाठी थोडेसे खावे लागले रात्री.  हे सारे मला पचणे कठीण जात होते.
मी कधी कधी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तरी मुद्दाम लक्ष वेधून घ्यायचा. बरं अगदीच तुटक वागावे तरी हा इतका हळवा, लहान मुलांसारखा. कधी रडेल सांगता येणार नाही . त्याचे मित्र त्याला ओरडायचे, चिडवायचे पण तरी नाहीच. कोर्स संपायला काही दिवसाचा अवधी असताना त्याने आपल्या बायकोला बोलावून घेतले होते, माझी तिच्याशी ओळख करून देण्यासाठी मी तिच्या हॉटेल वर यावे असा हट्ट धरला त्याने, आणि तो पुरवून घेतलाच. तिथे गेल्यावर राखी बांधून घेतली. माझ्या पायातील पैंजणांकडे याचे फार लक्ष. ते वापरलेले पैंजण याने आपल्या बायकोला द्यायला लावले आणि तिला सांगितलेसुद्धा पट्ठ्याने , कि दीदी वापरलेले आहे म्हणून देत नव्हती, मी हट्टाने मागून घेतलेत. स्वतःच्या हाताने माझ्या फोन मध्ये सगळ्या कुटुंबाचे नंबर सेव  केले.  मी त्याला विसरू नये म्हणून कि काय माझ्या पुस्तकांमध्ये स्वतःचे नाव लिहायचा, माझ्या वहीमध्ये स्वतःचा पत्ता लिहिला. बायकोला माझ्याशी जोडून दिले, सोशल मीडियावर. कोर्स संपायची वेळ जवळ आली तसा  रोज डोळ्यात पाणी आणू लागला. इतरांना जेंव्हा घरची ओढ  तेंव्हा याला मात्र माझ्यापासून दूर जाण्याची हुरहूर होती. हा अनुभव माझ्यासाठी अगदीच नवा आणि अनाकलनीय.
प्रशिक्षण संपले तरी हा सतत माझ्या संपर्कात होता. मला वाटले होते थोड्या दिवसाने विसरून जाईल. कारण आतापर्यंत हाच अनुभव होता माणसांचा. म्हणून कधी कोणाशी फार जवळीक साधली नाही, आणि कोणाच्यात इतके गुंतून जाणे स्वभावात ही  नाही. पण सतत आग्रह करून, माझ्या नवऱ्याला फोन करून करून पुढच्या भाऊबीजेला मला तिकडे बोलवून घेतले, ५/६ दिवस आम्ही तिकडे राहिलो, तर आदरातिथ्य म्हणजे काय असते याचा आदर्श नमुना त्याच्या कुटुंबियांकडून पाहायला मिळाला. अविस्मरणीय.
अलीकडच्या ६ महिन्यात त्याचा काहीच संपर्क नाही, म्हंटल्यावर मला वाटले हे साहजिकच आहे, वेळेबरोबर आता नात्यातील ओलावाही कमी कमी होत जातोच . तरीही प्रत्येक वेळी  तोच फोन करतो म्हणून या दिवाळीत त्याला फोन केला. याचे बोलणे तुटक, थोडक्यात. आपुलकी मात्र तीच.
सहज थट्टेत  एक कमेंट टाकली, " भूल गया क्या दीदी को? " आणि विसरून ही  गेले.  दुसऱ्यादिवशी त्याचा फोन आला. संध्याकाळी ८च्या दरम्यान. तो थेट रात्री १२.१५ पर्यंत. बायको सोडून गेली हे सांगायला. आधी विश्वास नाही बसला. मी बोलते म्हणाले तिच्याशी. नंतर त्याने दोन तासांनी जे खरे कारण सांगितले, त्याने तर हादरून गेले मी. ती परत येणार नाही याची मला मनोमन खात्री वाटली, पण याला भाबडी आशा.? मीच नमते घेईन., मी दीदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागेन इथून पुढे. पण ती येऊ दे?. खरे तर चूक  तिची होती, पण ती खूपच  ताठ होती, आणि याची काहीच चूक नसताना हा झुरत होता, रडत होता, तिच्याजवळ भीक मागत होता पुन्हा एक संधी देण्याची. आणि ती दगडाच्या काळजाची झाली आहे. कोणाचेच ऐकेना, अजिबात याचे तोंड पाहणार नाही अशी टोकाची भूमिका. हा मात्र मऊ मेणाहूनी . अजून तिला स्वीकारायला तयार. " दीदी तुमचे ऐकले नाही, बदलेन बदलेन म्हणत राहिलो पण केले काहीच नाही. आता नक्की बदलेन, ती येऊ दे फक्त, नाहीतर कोणीतरी तीचा गैरफायदा घेईल, भरकटेल  ती. तुम्ही त्याच वेळी का नाही म्हणालात कि तू माझे ऐकले नाहीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी? "
कमाल आहे या पोराची.  याची चूक फक्त इतकीच कि हा आजच्या मुलांसारखा रोमँटिक, स्टयलिश, रुबाबदार आणि रंगेल, बनेल नव्हता. जगात अशीही माणसे असतात, देवावर अपार श्रद्धा, माणसांवर प्रचंड प्रेम, लहान मुलासारखा निरागसपणा, चांगुलपणावर ठाम विश्वास. आणि हम भले तो जग भला ही भोळीभाबडी समजूत.
३ वर्षांपूर्वी त्याच्या देशातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात असण्याचीही कल्पना नव्हती. आणि आज तो रडतोय म्हणून मी अस्वस्थ होते आहे. रात्री जागते आहे. कोणते नाते कोणास ठाऊक, पण काहीतरी आहे खरे, जिव्हाळ्याचे, रक्ताचे नसले तरीही. नाती फक्त जन्मानेच जुळत नाहीत, हेही त्याच्यामुळेच पटले. तो या जगातला एक अपवादच आहे, म्हणूनच त्याच्या वाट्याला हे सगळे आले आहे. देव त्याची परीक्षा आणखी ना पाहता त्याला सौख्य देवो, अशीच प्रार्थना.

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

ती

तिशी ओलांडलेली ती. सौन्दर्याच्या रूढ परिभाषेत न बसणारी.  म्हणजे चाफेकळी नाक, रेखीव चेहरा, कमनीय बांधा, या व्याख्येत न बसणारी.  पण तिच्यावर खिळणार  नाही अशी नजर सापडायची नाही.  मग ती वयाने लहान मुले असोत किंवा वय झालेली व्यक्ती.स्वतःला present कसे करावे याची पुरेपूर जाण  व ज्ञान असणारी ती.   डोळे मात्र  अगदी चुंबकीय. आणि त्यांना कसे अधोरेखित करावे हे ही  तिला कळते.चेहऱ्यातील उणीवा  कशा झाकाव्या याबद्दल हि ती बरीच जागरूक . चेहऱ्यावरचे केस जरा जरी मागे केले तरी कावरी बावरी होणारी ती, प्रखर विरोध करणारी ती, हे चित्र हि कौतुस्कापदच. आपण कोणते रंग वापरले म्हणजे सदैव उठून दिसू, किंवा आपले फोटो चांगले येतील याबद्दल हि चांगलीच जागरूक.  तिच्या दृष्टीने सौन्दर्य हे तिचे  मुख्य ध्येय असावे असे पाहणाऱ्याला वाटावे. त्यासाठी वाटेल तेवढे  कष्ट घ्यायची तिची तयारी, पण एक कणभर त्यात उणीव पडू देणार नाही. अगदी सभे मध्ये ही  ती प्रसाधन करू शकते बिनधास्त. आणि त्या कौतुकाच्या नजरा ... त्यांचे तर जणू व्यसन जडलेय  तिला.  तयार होऊन  बाहेर पडल्यानंतर तिची ती भिरभिरणारी नजर सर्वत्र कौतुकाचा शोध घेत असते जणू.  आपल्याला कोणी पाहत नाही तोपर्यंत रेंगाळणारी ती अशीही मला भासते. आणि जर कोण तिच्या मागे पुढे करत नसेल तर तो अहंकारी, गर्विष्ठ . मग ही त्याला काडीचीही किंमत देणार नाही, मग भले ही  तो कितीही हुशार असो.
                लाडीकपणे तक्रार करणारी ती, कि हा माझ्याशी फ्लर्ट  करतो, तो माझ्याशी फ्लर्ट करतो. पण त्याने तसे करावे म्हणून कि काय त्याच व्यक्तींच्या मागे पुढे करणारी ती एखाद्या छोट्याशा बालिकेप्रमाणे भासते मला. स्त्रियांपेक्षा पुरुष मित्रांमध्ये जास्त आनंदी असणारी ती.  कारण तिच्यामते  एन्जॉय करणे, म्हणजे सिनेमा पाहणे, भटकणे आणि खाणे, आणि हे तिला मित्रांच्या संगतीत जास्त अनुभवता येते. आणि तसे पाहता हे नैसर्गिकच आहे. फक्त आपण ते स्वीकारत नाही, आपल्या वरच्या संस्कारांमुळे. स्त्री पुरुष यांच्यामध्ये निखळ मैत्री सुद्धा असू शकते जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर. तिच्या मनात जर काही पाप असते तर तिने हे उघड उघड सांगितले हि नसते . तिचा संसार उध्वस्त होण्याचे कारण हि तिलाच ठरवले काहीजणांनी. कारण तिचे असे मोकळे ढाकळे  वागणे.तिच्या चारित्र्याबद्दल उलट सुलट बोलणारे लोक, असे कितीसे तिच्या सहवासात राहिलेत, काही दिवस किंवा काही तास फक्त. पण इतके खात्रीने बोलतात ना हे कोणाबद्दल पण कि जणू हेच प्रत्यक्षदर्शी आहेत त्या घटनांचे.  पण तिने मला सांगितलेले कारण हि खरे असू शकतेच. चूक त्याची हि असेल कदाचित. फक्त कोणाचे तरी ऐकून मी खरे खोटे तर ठरवू शकत नाही. सत्य एक तिलाच माहिती. आणि ते जाणून घेण्याचे मला काहीच कारण नाही. ती माझ्याशी चांगली आहे, ती सच्ची आहे. ती आभास निर्माण करत नाही स्वतःबद्दल, हेच माझी तिच्याशी मैत्री होण्यासाठी पुरेसे आहे. ती आपल्या खाजगी आयुष्यात जे असेल जशी असेल, त्याच्याशी मला काहीही देणे घेणे असण्याची गरज मुळीच नाहीये.
बस ती जशी आहे, तशी माझी मैत्रीण आहे. लोकांच्या दृष्टीतून तिच्याकडे पाहून मला माझा दृष्टिकोन खराब करायचा नाहीये.  

शनिवार, ५ मार्च, २०१६

पिढी

बऱ्याच दिवसांनी लिहिते आहे. पण हा मुद्दा बरेच दिवस मांडायचा होता .
 नवी पिढी म्हणजे नेमकी कोणती? आणि जनरेशन गैप म्हणजे तरी काय? प्रश्नाचे कारण असे कि माझाच एक भाऊ मला तुझी पिढी ,माझी पिढी अशी भाषा वापरून बोलतो. आता भाऊ म्हणजे माझ्याच पिढीतील नाही का? पण वयातील अंतरामुळे तो मला जुन्या पिढीतील ठरवून टाकतो . बर आता आमच्याही पूर्वीच्या पिढ्या होत्याच की . पण त्यांना आम्ही पूर्णपणे  चुकीचे किंवा आउटडेटेड नाही ठरवत कारण आम्हाला व्यापक दृष्टी मिळाली आहे सामावून घेण्याची आणि सामावून जाण्याची.
जुन्या पिढीतील संगीत असो किंवा विचार, आम्ही अगदी सहज स्वीकारू शकतो . मग या १०-१२ वर्षातच असे काय बदललंय कि त्यांना जुळवून घेताना, स्वीकारताना त्रास होतोय . आम्ही जे म्हणतो,आम्ही जे करतो तेच बरोबर, कारण आमच्या काळात हेच योग्य आहे, हा दृष्टीकोन येतो कोठून? आणि मग हे विचार यांना कोठे नेणार आहेत? जुने संगीत? किती कंटाळवाणे? जुने विचार? ह्य…। आता कोणी वागते का तसे? काळ बदललाय 
असहनशीलता , अधिरेपणा, आक्रमकता, अपुरे ज्ञान असले तरी तेच पूर्ण असल्याची भावना, असा तरुण आज जास्त दिसतो . याचा पूर्ण दोष मिडियाच्या माथी मारून रिकामे होते येईल का? कोठेतरी कोणालातरी यामागील कारण नक्की सापडेल .बर तसे पाहावे तर अगदीच सर्वच्या सर्व तरुण मंडळीही तशी नाहीत, बहुसंख्य असली तरी . हल्लीच्याच पिढीने काही नवे पण चांगले ही  पायंडे पाडलेत , या पिढीतही  जशी नकारात्मक लोकसंख्या आहे तशी सकारात्मकता दर्शवणारे ही  आहेतच . त्यांचे कौतुक करणे ही  क्रमप्राप्त आहे.
अविवाहित असतानाच एका डाऊन सिंड्रोम ने ग्रस्त बालकास दत्तक घेणारा पुण्याचा आदित्य  तिवारी पहा . आता सोफ्टवेअर  इंजिनिअर म्हणून त्याला खूप मुली मिळाल्या असत्या पण एका विशेष गरजा असणार्या मुलाची आई व्हायला तयार होणारी कोणी अवलिया भेटलीच तर ठीक आहे, पण बहाद्दर डगमगला नाही . कितीतरी धडपड करून हवे ते केलेच.
                                     किंवा पहिला व्हीलचेयर बॉडी बिल्डर आनंद अर्नोल्ड 
अगदी १४ व्या आणि १२व्या वर्षी उद्योजक झालेले आणि IIMB , TEDX मध्ये ही जाऊन मार्गदर्शन करणारे श्रवण कुमारन व संजय कुमारन 

ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे . अशी अजून कितीतरी आहेत. अर्थात मुद्दा पिढीचा नाहीये, मुद्दा आहे दृष्टिकोनाचा . कोणत्याही पिढीमध्ये सकारात्मक दृष्टीकोन असू शकतो, सामावून जाण्याची आणि सामावून घेण्याची क्षमता असू शकते, तशीच कोणत्याही पिढीमध्ये दुराग्रही भूमिका, आजच्या काळातले आम्हालाच कळते ही  भावना असू शकते