बऱ्याच दिवसांनी लिहिते आहे. पण हा मुद्दा बरेच दिवस मांडायचा होता .
नवी पिढी म्हणजे नेमकी कोणती? आणि जनरेशन गैप म्हणजे तरी काय? प्रश्नाचे कारण असे कि माझाच एक भाऊ मला तुझी पिढी ,माझी पिढी अशी भाषा वापरून बोलतो. आता भाऊ म्हणजे माझ्याच पिढीतील नाही का? पण वयातील अंतरामुळे तो मला जुन्या पिढीतील ठरवून टाकतो . बर आता आमच्याही पूर्वीच्या पिढ्या होत्याच की . पण त्यांना आम्ही पूर्णपणे चुकीचे किंवा आउटडेटेड नाही ठरवत कारण आम्हाला व्यापक दृष्टी मिळाली आहे सामावून घेण्याची आणि सामावून जाण्याची.

जुन्या पिढीतील संगीत असो किंवा विचार, आम्ही अगदी सहज स्वीकारू शकतो . मग या १०-१२ वर्षातच असे काय बदललंय कि त्यांना जुळवून घेताना, स्वीकारताना त्रास होतोय . आम्ही जे म्हणतो,आम्ही जे करतो तेच बरोबर, कारण आमच्या काळात हेच योग्य आहे, हा दृष्टीकोन येतो कोठून? आणि मग हे विचार यांना कोठे नेणार आहेत? जुने संगीत? किती कंटाळवाणे? जुने विचार? ह्य…। आता कोणी वागते का तसे? काळ बदललाय
असहनशीलता , अधिरेपणा, आक्रमकता, अपुरे ज्ञान असले तरी तेच पूर्ण असल्याची भावना, असा तरुण आज जास्त दिसतो . याचा पूर्ण दोष मिडियाच्या माथी मारून रिकामे होते येईल का? कोठेतरी कोणालातरी यामागील कारण नक्की सापडेल .बर तसे पाहावे तर अगदीच सर्वच्या सर्व तरुण मंडळीही तशी नाहीत, बहुसंख्य असली तरी . हल्लीच्याच पिढीने काही नवे पण चांगले ही पायंडे पाडलेत , या पिढीतही जशी नकारात्मक लोकसंख्या आहे तशी सकारात्मकता दर्शवणारे ही आहेतच . त्यांचे कौतुक करणे ही क्रमप्राप्त आहे.
अविवाहित असतानाच एका डाऊन सिंड्रोम ने ग्रस्त बालकास दत्तक घेणारा पुण्याचा आदित्य तिवारी पहा . आता सोफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्याला खूप मुली मिळाल्या असत्या पण एका विशेष गरजा असणार्या मुलाची आई व्हायला तयार होणारी कोणी अवलिया भेटलीच तर ठीक आहे, पण बहाद्दर डगमगला नाही . कितीतरी धडपड करून हवे ते केलेच.
अगदी १४ व्या आणि १२व्या वर्षी उद्योजक झालेले आणि IIMB , TEDX मध्ये ही जाऊन मार्गदर्शन करणारे श्रवण कुमारन व संजय कुमारन
ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे . अशी अजून कितीतरी आहेत. अर्थात मुद्दा पिढीचा नाहीये, मुद्दा आहे दृष्टिकोनाचा . कोणत्याही पिढीमध्ये सकारात्मक दृष्टीकोन असू शकतो, सामावून जाण्याची आणि सामावून घेण्याची क्षमता असू शकते, तशीच कोणत्याही पिढीमध्ये दुराग्रही भूमिका, आजच्या काळातले आम्हालाच कळते ही भावना असू शकते

वाह मस्तच लिहिलय हेमा.
उत्तर द्याहटवाdhanyawaad jayu.
हटवा