साधारणपणे दोन ते अडीच वर्षांपूर्वी मला तो एका प्रशिक्षणादरम्यान भेटला. खूप दुरून आम्ही सर्व जण आलो होतो. अगदी भारताच्या सर्व कोपऱ्यातून. त्यामुळे एकमेकांबद्दल कुतूहल असणे साहजिक होते. प्रत्येक जण दुसऱ्याशी बोलण्याचा ,त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या १४८ जणांपैकी हा ही एक. एकदम साधा सुधा , आजकालच्या मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळा. माझ्यासाठी त्याचे अस्तित्व इतर सर्वांसारखेच. फार वेगळा असा तो मला जाणवलाच नाही पण पहिला आठवडा संपता संपता आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि त्याच्या बोलण्यातून जाणवले कि अगदी सुरुवातीपासून तो माझ्या आसपास नुसता नाहीये तर तो माझ्यावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे. माझ्या खाण्यापिण्यापासून माझ्या वागण्याबोलण्यापर्यंत. तसे इतर सर्वांच्याही मी एव्हाना लक्षात आले होते पण याचे काहीतरी वेगळेच. एका रविवारी आम्ही फिरायला बाहेर गेलो असताना काही अडचणींमुळे आम्हाला यायला मध्यरात्र उलटून गेली तर हा बिचारा तितका वेळ जागाच.
आणि मग दुसऱ्यादिवशी मला म्हणाला, "मेरी कोई बहन नाही है. मुझे हमेशा से आपके जैसी ही दीदी चाहिये थी . क्या मैं आपको दीदी बुला सकता हूँ ? " नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्याने काही चुकीची मागणी केली नव्हती. त्यादिवसापासून अगदी माझ्या भोवती होता. सक्ख्या भावाने ही घेतली नसती इतकी काळजी घ्यायचा,खूप जपायचा. मी कधी कधी अवघडून जायचे, कारण हा पंचविशीतला असला तरी उंचापुरा आणि मी चाळिशीतली असले तरी तुलनेने बारिकच. ह्याचे सतत सोबत असणे, वर्गात सोबत बसणे , बाहेर जातानाही सतत सोबत असणे, सतत फोटो काढत राहणे लोकांना खटकू शकते असे जाणवून मी खूप अस्वस्थ व्हायची, पण याला मात्र परवाच नव्हती. बर रात्री रूमवर गेल्यावर ही झोपेपर्यंत याचे मेसेज आणि सकाळी उठल्यापासून पुन्हा सुरु. नाष्ट्याला गेल्यावर वेळा एक व्हाव्यात म्हणून सकाळी लवकर उठून आवरायचा. जेवताना ही काही कमी पडू नये हे पाह्यचा. कधी रोल नंबर प्रमाणे गट पाडताना मी वेगळ्या गटात गेले तरी हा अस्वस्थ व्हायचा आणि वर्गात माझा फोन ऑफ असतो हे माहित असून ही सतत मेसेज करायचा, आणि मी उत्तर देत नाही म्हणून रडवेला व्हायचा. बाहेर नेताना ही आमच्या बसेस रोल नंबर प्रमाणे एक व्हायच्या नाहीत, म्हणून रडकुंडीला यायचा , आणि बस थांबण्याची वाट पाहायचा. आमच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर माझे पाय दुखले म्हणून मी रडले तर हा दिवसभर रडून ना जेवता बसला, आणि मी आपली चार वेळा जेऊन व्यवस्थित. पुन्हा त्याच्यासाठी थोडेसे खावे लागले रात्री. हे सारे मला पचणे कठीण जात होते.
मी कधी कधी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तरी मुद्दाम लक्ष वेधून घ्यायचा. बरं अगदीच तुटक वागावे तरी हा इतका हळवा, लहान मुलांसारखा. कधी रडेल सांगता येणार नाही . त्याचे मित्र त्याला ओरडायचे, चिडवायचे पण तरी नाहीच. कोर्स संपायला काही दिवसाचा अवधी असताना त्याने आपल्या बायकोला बोलावून घेतले होते, माझी तिच्याशी ओळख करून देण्यासाठी मी तिच्या हॉटेल वर यावे असा हट्ट धरला त्याने, आणि तो पुरवून घेतलाच. तिथे गेल्यावर राखी बांधून घेतली. माझ्या पायातील पैंजणांकडे याचे फार लक्ष. ते वापरलेले पैंजण याने आपल्या बायकोला द्यायला लावले आणि तिला सांगितलेसुद्धा पट्ठ्याने , कि दीदी वापरलेले आहे म्हणून देत नव्हती, मी हट्टाने मागून घेतलेत. स्वतःच्या हाताने माझ्या फोन मध्ये सगळ्या कुटुंबाचे नंबर सेव केले. मी त्याला विसरू नये म्हणून कि काय माझ्या पुस्तकांमध्ये स्वतःचे नाव लिहायचा, माझ्या वहीमध्ये स्वतःचा पत्ता लिहिला. बायकोला माझ्याशी जोडून दिले, सोशल मीडियावर. कोर्स संपायची वेळ जवळ आली तसा रोज डोळ्यात पाणी आणू लागला. इतरांना जेंव्हा घरची ओढ तेंव्हा याला मात्र माझ्यापासून दूर जाण्याची हुरहूर होती. हा अनुभव माझ्यासाठी अगदीच नवा आणि अनाकलनीय.
प्रशिक्षण संपले तरी हा सतत माझ्या संपर्कात होता. मला वाटले होते थोड्या दिवसाने विसरून जाईल. कारण आतापर्यंत हाच अनुभव होता माणसांचा. म्हणून कधी कोणाशी फार जवळीक साधली नाही, आणि कोणाच्यात इतके गुंतून जाणे स्वभावात ही नाही. पण सतत आग्रह करून, माझ्या नवऱ्याला फोन करून करून पुढच्या भाऊबीजेला मला तिकडे बोलवून घेतले, ५/६ दिवस आम्ही तिकडे राहिलो, तर आदरातिथ्य म्हणजे काय असते याचा आदर्श नमुना त्याच्या कुटुंबियांकडून पाहायला मिळाला. अविस्मरणीय.
अलीकडच्या ६ महिन्यात त्याचा काहीच संपर्क नाही, म्हंटल्यावर मला वाटले हे साहजिकच आहे, वेळेबरोबर आता नात्यातील ओलावाही कमी कमी होत जातोच . तरीही प्रत्येक वेळी तोच फोन करतो म्हणून या दिवाळीत त्याला फोन केला. याचे बोलणे तुटक, थोडक्यात. आपुलकी मात्र तीच.
सहज थट्टेत एक कमेंट टाकली, " भूल गया क्या दीदी को? " आणि विसरून ही गेले. दुसऱ्यादिवशी त्याचा फोन आला. संध्याकाळी ८च्या दरम्यान. तो थेट रात्री १२.१५ पर्यंत. बायको सोडून गेली हे सांगायला. आधी विश्वास नाही बसला. मी बोलते म्हणाले तिच्याशी. नंतर त्याने दोन तासांनी जे खरे कारण सांगितले, त्याने तर हादरून गेले मी. ती परत येणार नाही याची मला मनोमन खात्री वाटली, पण याला भाबडी आशा.? मीच नमते घेईन., मी दीदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागेन इथून पुढे. पण ती येऊ दे?. खरे तर चूक तिची होती, पण ती खूपच ताठ होती, आणि याची काहीच चूक नसताना हा झुरत होता, रडत होता, तिच्याजवळ भीक मागत होता पुन्हा एक संधी देण्याची. आणि ती दगडाच्या काळजाची झाली आहे. कोणाचेच ऐकेना, अजिबात याचे तोंड पाहणार नाही अशी टोकाची भूमिका. हा मात्र मऊ मेणाहूनी . अजून तिला स्वीकारायला तयार. " दीदी तुमचे ऐकले नाही, बदलेन बदलेन म्हणत राहिलो पण केले काहीच नाही. आता नक्की बदलेन, ती येऊ दे फक्त, नाहीतर कोणीतरी तीचा गैरफायदा घेईल, भरकटेल ती. तुम्ही त्याच वेळी का नाही म्हणालात कि तू माझे ऐकले नाहीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी? "
कमाल आहे या पोराची. याची चूक फक्त इतकीच कि हा आजच्या मुलांसारखा रोमँटिक, स्टयलिश, रुबाबदार आणि रंगेल, बनेल नव्हता. जगात अशीही माणसे असतात, देवावर अपार श्रद्धा, माणसांवर प्रचंड प्रेम, लहान मुलासारखा निरागसपणा, चांगुलपणावर ठाम विश्वास. आणि हम भले तो जग भला ही भोळीभाबडी समजूत.
३ वर्षांपूर्वी त्याच्या देशातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात असण्याचीही कल्पना नव्हती. आणि आज तो रडतोय म्हणून मी अस्वस्थ होते आहे. रात्री जागते आहे. कोणते नाते कोणास ठाऊक, पण काहीतरी आहे खरे, जिव्हाळ्याचे, रक्ताचे नसले तरीही. नाती फक्त जन्मानेच जुळत नाहीत, हेही त्याच्यामुळेच पटले. तो या जगातला एक अपवादच आहे, म्हणूनच त्याच्या वाट्याला हे सगळे आले आहे. देव त्याची परीक्षा आणखी ना पाहता त्याला सौख्य देवो, अशीच प्रार्थना.

hemlataa tujha lekh kevha yeto yachi waat pahaat hpte me. ha lekh wahcun man helawun gele ga. ko konacha ha pan tula bhawu mhanun milala tuze bhagya aahe. aani tyachya watyala je aale aahe te matra changlya vyaktichya aani manane nirmal shuddh asnarya vyaktichyach watyalaa yete ha majha swtahacha anubhaw aahe.... keep writing dear...
उत्तर द्याहटवाkharay g agadi. ha itka bhola ki baykochi itki mothi chook asun swatah maafi maagto, swatahla badlen mhanto. ani sagle visrayla tayar ahe. vait vatate khoop. :(
हटवाKhupach sundae... Bhavsparshi .. Kharach Nate ya shabdacha arthach samjto ....
उत्तर द्याहटवाdhanyawaad aplya manapasunchya pratikriyebaddal.
हटवा